व्यसनामुळे जे मानसिक आजार होतात, त्याची ही कहाणी
नको नको ते मनात येते
अगतिक मजला करुनि जाते,
भयंकराची भीति आणिक शंकेची गति
अपसूक वाढत रहते अस्वस्थतेची स्तिथि ,
जाणीव जणू मरुनि पडते
कधी जणू मन निपचित होते,
कधी अनावर क्रोध माझा
माझ्या वारी स्वारी करी,
बेभान उद्रेक मज
लाजवी अनेक समयी,
खरे तर मी असा नव्हतो
बुरा परी मी राक्षस नव्हतो,
आता कळेना माझे मला,
वेडा म्हणू की व्यसनी स्वतःला …..
वेडा म्हणू की व्यसनी स्वतःला .......
No comments:
Post a Comment