व्यसनापासून दूर राहू लागलेल्या मित्रांच्या या भावना। व्यसनमुक्तीच्या सुरुवतीच्या काळात कोणी सहज विश्वास ठेवत नाही, आधार देत नाही तरीही व्यसनपासून दूर राहत स्वतःशी लढणाऱ्या धाडसी मनाच्या फ़ीनिक्स रूग्ण मित्रांच्या वेदनांची ही कविता।
सर्वांमधे असतो परी हरपतो मी भान,
उराशी येतात नकळत भूतकाळाचे पाश
नव्याने शोधतो आहे जीवनाचे नवे रंग
परी आप्त दुःखविल्याची बाळगतो खंत
रोज नव्याने बजावितो मी मजला
पुन्हा नको तो एकच प्याला
दशक अवघे विरुन गेले
मरण यातना देवून गेले
परी आता उठेन म्हणतो
उरले जे ही जपेन म्हणतो
पुन्हा एकदा झेपावितो उंच
व्यसनमुक्तीचा घेऊनी मंत्र। ..
व्यसनमुक्तीचा घेऊनी मंत्र। ..
शीतल बिड़कर
No comments:
Post a Comment