मागच्या कही वर्षात महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतातच जणु व्यसनमुक्ती केंद्रांचा सुळसुळाट झाला। मी पुण्यात मुक्तांगण नावाच्या एका प्रशिक्षण केंद्रात काम करात होेते आणि सुदैवाने मला पाच राज्यामधील व्यसनमुक्ती केंद्रांची पहाणी करण्याची संधि मिळाली। महाराष्ट्र, गोवा, मध्यप्रदेश , गुजरात आणि छत्तीसगढ़ या राज्यमधील जवळपास ९२ केंद्रांशी माझा संपर्क होता।
त्यानंतर मी २०११ पासून आंध्र प्रदेशमधे काम करीत आहे, सर्व अनुभव एकत्रित करता मला अस वाटत की चांगल्या व्यसनमुक्ती केंद्राचे काही निकष आपण ठरवले पाहिजेत, त्यामधे खालील मुद्यांचा समावेश असावा।
१. व्यसनमुक्ती केंद्रामधे शारिरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणारे लोक असावेत जसे फिजिशियन, साइकोलोजिस्ट, साइकेट्रिस्ट, कौंसिलर, असावेत
२. व्यसनापासून दूर राहणारे (रेकवरिंग अलकोहॉलिक्स ) लोकच अनेकदा केंद्र चालवत असल्याचे आढळते, पण प्रत्यक्षात त्याचा खास फायदा होत नाही। पिअर एज्युकेटर म्हणुन त्यांची भूमिका नक्कीच महत्वपूर्ण आहे पण उपचारामधे आणखीही घटक असणे योग्य ठरेल
३. कुटुंबीयांसाठीही मानसोपचार होणे आवश्यक आहे.
४. स्व मदत गटाची ओळख व्यसनमुक्ती केंद्राद्वारे होणे गरजेचे आहे.
५. अनेकदा व्यसनमुक्ती केंद्रांमधे मानसिक आजारांच्या रुग्णांचाही समावेश असतो, अशा केंद्रामधे व्यसनमुक्ती साठी लागणारे उपचार वेगळे असल्याची खात्री करावी
६. व्यसनमुक्ति केंद्रांमधे शारीरिक मारहाण तसेच अपमानास्पद वागणूक असू नये.
७. व्यसनमुक्ति केंद्रांमधे पालकांना भेटीची परवानगी असावी।
८. उपचारानंतरही रुग्णानी काय करावे काय करू नये याच्या सुचना स्पष्ट असाव्यात।
९. उपचारादरम्यान रुग्णमित्राना मोकळेपणाने त्यांचे विचार आणि भावना व्यक्त करण्याची मुभा असावी।
१०. नोकरी, व्यवसाय याबाबतच्या देखील सूचना असाव्यात।
तुमच्या शंका जरूर विचारा
email: sheetal.bidkar@gmail.com
शीतल बिड़कर
No comments:
Post a Comment