विवाह समुपदेशन हा व्यसनमुक्ती उपचाराचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. अशाच एक सत्रात एका रुग्णमित्राच्या भावना कशा बदलत गेल्या त्याची ही कथा. आधी तो आला आणि तिचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला, मग थोड़ा राग आणि तिरस्कार दाखवला आणि सरतेशेवटी तो पुरता अंतर्मुख झाला।
वेदना
ती डोळ्यात आशांची आसवे घेवून बसली होती
न रहवून माझ्या चांगुल पणाची कड घेतच होती
भला होतो म्हणे मी लग्नाच्या वेळी
मोडित काढला संसार म्हणे मी तिचा याच दारूपाई। ……
खरच। ……… का हे खर आहे?
आजार मला आणि वेदना तिला आहे
मला वाटायच। … मीच ना पितो?
मग त्रास तिला का बर होतो ?
आज ती खर बोलली
तिची वेदना डोळ्यातून वाहीली
कितीदातरी मी तिला मारल
संसार वाचवायचा म्हणुन
हरबार तिन कटु बाजूला सारल
मला कळलच नाही तिन कित्येकदा असच सावरल
माझ्या चुकांचे चटके सहन करून
माझी काळजी कारण कस तिन पेलल?
माझी काळजी कारण कस तिन पेलल?
शीतल बिड़कर
No comments:
Post a Comment