Search This Blog

Saturday, 26 July 2014

अनोळखी

आम्ही आठवड्याच्या शेवटी अशा सत्रांची आखणी करतो ज्यामधे रुग्ण मित्र काहीतरी नव्याने व्यक्त करतील, अशाच एका सत्रातील ही कविता जी एका रुग्ण मित्राने लिहिली आहे

मला व्यसनमुक्ति केंद्रामधे आधार देणारे माझे समुपदेशक कसे होते त्याची ही कविता


पाठमोरा एकटा खिडकीशी बसुन मी
मुसमुसन बोलत होतो  ……।
शब्द नव्हे तर यातना म्हणा
डोळ्यातून टपकत होत्या,

उमगली जणू मजला
स्वतःची सद्यस्थिती,
अवघडलो  , बावरलो मी
 तुटला  आतून  परी

असंख्य चूका अन असंख्य शाप
समोर केवळ  भकास सकाळ,
व्यसनात बुडलेले, कललेले प्राण
जगण्यालाही ना उरला त्राण

कोणी अचानक पाठीवरी देवून थाप
बोलला स्वतःची कहाणी कित्येक तास
भोगुन, जगून माझेच हाल
मदतीचा का देवू पाहतो हात?
म्हणे मला ………

  मित्र वा बंधू समज
शांत ऐकणारा सोबती समज
मरगळ सारी बोलून टाक
चैतन्याला देउनि हाक

म्हणे तो मी ही होतो व्यसनी,
दोघे मिळून तोडू व्यसनाची साखळी
असलो जरी अनोळखी

दोघे मिळून तोडू व्यसनाची साखळी
असलो जरी अनोळखी
असलो जरी अनोळखी




अनामिक मद्यपी









No comments:

Post a Comment