मला नेहमीच ग्रामगितेविषयी प्रचंड मोठ आकर्षण वाटत आलयं। खुप उघड्या डोळ्यांनी आणि खुप खुल्या विचारांनी ग्रामगीतेची रचना झाली आहे असे वाटते। माला कुतूहल होत की व्यसनबद्दल ग्रामगीतेमधे काय बर लिहीलाय?
माझी शोधमोहीम सुरु झाली आणि मला जे समजल ते मी इथे मांडण्याचा प्रयत्न करते आहे.
वैष-वैभव या ग्रामगीतेच्या सोळाव्या अध्यायामध्ये तुकडोजी महाराजांनी जी लक्षण सांगितली आहेत ती अशी. हा श्लोक व्यसनासाठी अनुकूल घटकांना स्पष्ट करतो। अनुकूल घटक म्हणजे बाळाचे पाळण्यात दिसणारे पाय. अशी लक्षण जी रोगाचे निदान करण्यापूर्वीच रोगीमध्ये दिसू लागतात।
स्वैराचार हीन विचार। राजस तामस आहार विहार। दिनचर्येत नाही ताळतंत्र। त्यांचे इहपर सुख नाशे।
खरच ज्यांना स्वातंत्र आणि स्वैराचार यातली पुसत रेष कळत नाही त्यांच्यात प्रयोगशीलता वाढीस लगते। कुतूहल, मित्रांचा प्रभाव यामुळे आहार-विहार बदलतो। सहजच, रात्री उशिरा घरी येणे किंवा सकाळी उशिरा उठणे, कधीही जेवण कशाचाच नियम रहत नाही। मग अस असताना समाधानचा नाश होणे स्वाभाविकच आहे नाही का?

चहा- चिवड़ा चिरकुटाचे दास। आपुल्या तनमनधनाचा नाश । करोनी बिघडवती जीवनास । गावच्यांच्याही
जेव्हा माणस अधिक वेळ घराबाहेर राहु लागतात तेव्हा सिगारेट, दारू अश्याचे व्यसनी बनून स्वतःच्या जीवनाचा आणि पर्यायाने गावच्यांचाही आरोग्याचा नाश करतात
किती खर आहे नाही? दोन साध्या ओळी आणि व्यसनापासून वाचण्याचे प्रतिबंधात्मक उपाय ओळखता येतील। बाहेरच्या अनेक देशात वयोमानानुसार व्यसनासाठी अनुकूल असणाऱ्या घटकांची यादी करण्यासाठी अनेक वर्षांचे संशोधन सुरु आहे. मला मात्र या दोन ओळीतले शब्द अधिक बोलके वाटले।
No comments:
Post a Comment