कधी अचानक जिवलग भासे
कधी भासे विरक्त
कधी जाणतो हाळव्या भावना
कधी वागतो अगदीच परका
मनी तयाच्या असतो आम्ही
कधी मात्र ठरतो तुम्ही
माझा माझा म्हणणारा व्यक्ती
इतका कसा होतो स्वकेंद्री ?
मला उगाच वाटे भीति
रहिन का रे मी तुझी सखी ?
अशी काय ही जादू आहे?
बाटलीत जणू राक्षस आहे
जणीवा सांगतात तु माझा
पण राक्षस जागतो पुन्हा कसा ?
No comments:
Post a Comment