Search This Blog

Tuesday, 19 August 2014

५ कानगोष्टी व्यसनींच्या पत्नी साठी

५ कानगोष्टी व्यसनींच्या पत्नी साठी



व्यसनाचा आजार व्यसनी इतकाच त्याच्या पत्नीलाही आजारपणाचा अनुभव देतो। व्यसनी व्यसनाच्यामगे धावतो आणि पत्नी व्यसनी पतीच्या मागे धावताना दिसते। तो नशा करण्यासाठी अनेक तर्क लढवतो आणि ती त्याला वाचवण्यासाठी अनेक खटटोपी करते। तो दारू पिल्यावर धिंगाणा घालतो ही त्याने पिल्यावर किंवा पिऊ नये म्हणून धिंगाणा घालते। तो दारुचे पैसे जमावण्यासाठी खोटे बोलतो ही त्याला वाचवण्यासाठी खोटे बोलते। अश्या कित्येक पती -पत्नींना पाहून मला तर प्रश्नच पडतो, याच्यामधे आजारी कोण आहे ? कोणाचा आजार अधिक बळावलेला आहे ? एका बाजूला जीवापाड़ प्रेम करणारी हीच पत्नी अनेकदा पती पिवून आला म्हणुन त्याला मारते, चिड़ते, आरडाओरडा करते, आतल्या आत रोज त्याला असंख्य शाप देते। 
अशा द्रुष्टचक्रात अडकलेल्या माझ्या मैत्रिणींना या काही कान गोष्टी 

१. आजारी कोण? : व्यसन हा आजार आहे, त्याच स्वरुप समजावून घेवून आपण विचार केला पाहीजे की,  आजारी कोण आहे? मग माझ वागण सामान्य राहील आहे का? माझ्या आणि त्याच्या वागण्यात काही साधर्म्य आहे का? असेल तर पितो तो आणि नशा चढल्यासारखी बेभान मी तर होत नहीं ना? 

२. दोष कुणाचा? : सातत्याने इतरांना, नशीबाला किंवा स्वतःला दोष देण्याच पूर्णतः थांबवल पाहिजे। एक मिनिटभर विचार करा की तुमच्या नवऱ्याला ताप आला किंवा शारीरिक आजरानी तो त्रस्त झाला तर तुम्ही स्वतःला दोषी मानता का? नाही ना? मग या व्यसनाच्या आजारासाठी तुम्ही स्वतःला किंवा त्या रोगीला कसेबर दोषी मानू शकता? दोष कुणाचा हे कळल्याने आजार थोडीच बरा होणार आहे? आजार तर उपचाराने ठीक होईल मग त्याबाबत अधिक विचार झाला पाहीजे। 

३. मी बिचारी: अनेकदा स्त्रिया आपल्या नशिबाला दोष देताना दिसतात आणि स्वतःस असहाय्य समजतात। व्यसनी माणसाबरोबर जणू काही याही स्वतःची निर्णय शक्ती गमावतात, आता मात्र प्रत्येकीन विचारी होणे गरजेचे आहे. स्वतःच स्वतःची मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। 

४. लपवू नका: आपल्या पतीच्या व्यसनी वर्तनाबद्दल काही पत्नी लपवू पाहतात तसे करणे म्हणजे अप्रत्यक्ष पणे व्यसनाला हातभार लावण्यासारखेच आहे. त्यामुळे तुम्हाला आणि मुलांना त्रास वाढणारच आहे, व्यसनाचे परिणाम लपून राहणार नाहीत मात्र तुम्ही लपवण्याची धडपड करीत रहाल तर त्यादरम्यान ज्या गतीने आजाराची तीव्रता वाढणार आहे ती वाढतच राहील। 

५. खरा उपाय: कही वेळा शास्त्रशुद्ध उपचाराऐवजी काहीतरी अंधश्रद्धापूर्वक उपाय केले जातात, रुग्णाला विश्वासात न घेता त्याला काही औषधे दिली जातात आणि त्यामुळे अगदी जीवावर बेतण्याचा धोका तयार होतो। पुनर्वसन केंद्रामधेच उपाय झाला पाहीजे। व्यसनमुक्ति साठी काय सुविधा असाव्यात ते जाणल पाहीजे। 



शीतल बिडकर 

No comments:

Post a Comment