Search This Blog

Saturday, 9 August 2014

भेट

भेट

व्यसनमुक्तीच्या प्रवासामधे अनेकदा लोक स्वतःचे आत्मनिरीक्षण करतात, भावना, विचार, कृती याचा जणू  सखोल अभ्यास करतात। प्रत्येक दिवशी ते स्वतःलाच नव्याने भेटतात। अशाच एका भेटीची ही कहाणी।


अशाच एक कातरवेळी, मनात आली गोष्ट वेगळी,
धावलो आरश्याकडे अगदीच अवेळी,

पाहिले मी मज नव्याने त्यावेळी ,जागली नवी उमेद कोवळी,
मला मी नहाळयत होतो, नवी ओळख करीत होतो

भटकलो जरी काही काळ, जीवनाला नव्याने घालितो आळ,
येईल पुन्हा सुखाची सकाळ, बुडेल व्यसनाची संध्याकाळ,

गटचर्चा आणि लिखाण, सत्रात शोध सुरु झाला तात्काळ,
सखे, सोबती आणि मदत गट दविति व्यसनमुक्तीचा सुकाळ,

विचार आणि आचार बदल जाणवू लागला तात्काळ,
आप्तांचा विचार झाला अधिक सबळ,

भावली मला माझी अनोखी भेट.....
भावली मला माझी अनोखी भेट.....

शीतल बिडकर


No comments:

Post a Comment