Search This Blog

Monday, 11 August 2014

अधोगती: तुम्ही दारू पिता की दारू तुम्हाला पिते आहे?

अधोगती: तुम्ही दारू पिता की दारू तुम्हाला पिते आहे?

मला अनेकदा माझे रुग्ण मित्र विचारतात, आम्ही पीतो मग काय होतेय? झाला त्रास तर आम्हालाच ना होईल, बाकी कुणाला तक्रार करण्याच काय कारण? आम्ही आमच्या पैशाची पितो वगैरे , यावर मला एकच गोष्ट सांगते ती अशी..

कुणी किती अधोगती करुन घ्यावी हे प्रत्येकान स्वतःसाठी ठरवाव, पण त्याआधी आपण अधोगती कशाला म्हणतो याबाबतचाच विचार करणे अपरिहार्य आहे, अशाच काही अनोख्या केसेस इथे सांगत आहे.


१) नेहमी टाप टीप टिप राहणारा मोहन कधीही स्वछतेच्या बाबतीत तडजोड करीत नसे, त्याने एके दिवशी घरात कोणी नाही हे हेरून दारु पिण्याचा बेत आखला, रात्री उशीरा घरी येतनाच तो दारू, खाण्यासाठी काही घेऊन आला. तयारी अगदी खास केली आणि तो ठरल्याप्रमाणे पीऊ लागला। खाता -खाता त्याच्या हातून एक घास खाली ट्रे मधे पडला, त्याने तो घास फेकून देण्याचे ठरवले व पुन्हा पीऊ लागला, शेवटचा पेग भरण्यासाठी त्याने ग्लास ट्रे मधे ठेवला आणि बाटलीतील रहिलेली दारू तो ग्लास मधे ओतू लागला। झाल अस की दारू ग्लास ऐवजी ट्रे मधे सांडली। एका क्षणाचाही विलंब न करता त्याने ट्रे उचलला आणि तो पुन्हा ट्रे मधे सांडलेली दारू ग्लास मधे पिण्यासाठी ओतू लागला। आधी खाताना  ट्रे मधे पडलेल्या घासाची त्याला आता मुळीच कीळस आली नाही, त्या ग्लास मधे तो खाद्यपदार्थाचा तुकडा तरंगू लागला, त्याने ग्लास घेतला आणि पिणार इतक्यात मनात आल, 'छी छी हे काय? ट्रे मधे पडलेला घास मी कीळसून फेकणार होतो पण दारू मात्र ट्रे मधून परत ग्लास मधे मी आनंदाने पीटो आहे ?' नक्कीच मी दारू पितो नाही तर दारू मला पीत आहे.

मोहन आणखी घाबरला स्वतःवरच थोडा चिडला आणि तात्काळ दारू सोडण्याचा निश्चय त्याने केला आणि अगदी आठवडाभर तो समुपदेशानासाठी येवू लागला, त्याला दारू सोडण्यासाठी इतकीच अधोगति पुरेशी होती।

पण सगळेच मद्यपी स्वतःची अधोगति ओळखू शकत नाहीत, काही नोकरी घालवतात, कहींचि बायको निघून जाते, काही कायमचे अपंग होतात, काही रोडवर पडतात, काही नल्यामधे तर काही तुरुंगात जातात, काही पूर्ण वेडे होतात तरीही स्वतःची अधोगति ओळखता आणि मान्य करताना अपूरे पडतात। व्यसनाची हीच खरी शोकांतिका आहे.


शीतल बिडकर


No comments:

Post a Comment