मुखवटा
ही कविता मुखवटा वापरणाऱ्या माझ्या रुग्णमित्रांचे वर्णन करणारी आहे.
मी पडताना तो अचूक हेरतो
मी वर्तवितो हकीकत खोटी
आतून करितो तो मज आर्त विनवणी
मी लपतो अनेकदा त्याच्या पाठी
मग अनेक नव्या तो मांडतो अटी
मुखवटा माझाच हिणवतो मला
म्हणे..... का वास्तवाची वाटे लाज तुला ?
जगासमोर मुखवटा चालतो
पण एकट्याने असता पुरता बोचतो
व्यसनाच्या हव्यासापाई मुखवटा वापरला खरा
आता मात्र। …… माझ्या चेहऱ्याची ओळखच विसरलो पुरता
मला कळेना मी कसा?
मुखवटा की आरसा खरा ???
मुखवटा की आरसा खरा ???
शीतल बीडकर
No comments:
Post a Comment