Search This Blog

Thursday, 15 May 2014

ग्रामगीतेमधील व्यसनविषयीचे विचार- भाग 2


ग्रामगीतेच्या या पाठामधे व्यसनी लोकांची रहाणीमान दाखवले आहे.

उगीच करिती थाटमाट। कपाळी अत्तराचा मळवट। पावडर कंगवा आरसा चिरुट। खिशामाजी।।१०। 

एक विचार प्रणाली असही मानते कि व्यसन हा भावनांचा आणि विचारांचा आजार आहे. कही रुग्ण आपण खुप मोठे आहोत, खुप भव्य संपत्ती असल्याप्रमाणे ते महाग वस्तु खरेदी करतात, भले कर्ज बाजारी होतील पण तरिही फ़ूका पोकळ थाटमाट जपातील, त्यांना लागणाऱ्या आत्यंतिक गरजेच्या वस्तूंमधे त्यांच्या व्यसनसाठी लागणाऱ्या गोष्टींचाहि समावेश होतो। सामान्य व्यक्ती पावडर, कंगवा विसरत नाहीत तसे हे बाहदद्ऱ चिरुट, दारू विसरत नाहीत; व्यसनसाठीचा प्राधान्यक्रम ईथे दिसतो। व्यसनी किती अवलंबित असतात या पदार्थांवर हे दिसून येत. 

व्यसन तोंडाचे खोड़के करी। तेल लाविती वरचेवरी।केश फिरवोनि म्हणती साजरी।दिसतों आम्ही।।११। 
व्यसनाचे दिसून येणारे दुष्परिणाम आणि रुग्णामित्रांची हे दुष्परिणाम लपवण्याची धडपड येथे दिसते. अंगाचा थकवा लपवण्यासाठी उगच चांगली केशरचना करणे, पॉवडर लावणे वा आत खोल गेलेले गाल दिसू नयेत म्हणुन दाढी वाढवण, खोल गेलेले नयन झाकण्यासाठी गौगल लावण सुरु होत. ही तर माझी नवी स्टाईल! अस स्वतःला आणि इतरांना भसवण्याचे प्रयत्न सरु होतात। 

आंग निस्तेज जीर्ण झाले। खरूज गजकर्णादिके भरले। भारी कपडे घालोनी झाकीले। सौंदर्यासाठी।

हळु हळु व्यसनामुळे  शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमालीची खालवते। अशावेळी रुग्णामित्र पूर्णतः निस्तेज दिसू लागतो। अन्न जात नाही, आतड्यांचे आजर सुरु होतात, अनेक नव्या आजारांना शरीर जाणू पूरक बनत, मग बाहेरून कितीही डागडुजी केली तरीं सौंदर्य कस बर दिसणार ?

चालताना पढती आढ़या। बोट लावता खाती तनघड़या। बाता करिती बड्या बड्या। आम्ही शौकीन म्हणोनि। 
बहुतेक वेळा व्यसनी व्यक्ती आपल्याला व्यसन नसून तो माझां शौक असल्याचे सांगते, जीवनात सर्व काही अस्ताव्यस्त असतानाही लोकांना बड्या बड्या गोष्टी सांगितल्या जातात। 
दिवसेंदिवस दारू पिण्याची क्षमता वाढते त्याचा परिणाम चलण्यावर, तब्येतीवर इतकच नाही तर भावना आणि विचारांवर सुद्धा ठळकपणे दिसु लागतो। या पुढच्या श्लोकात हेच परिणाम सांगितले आहेत।

रड्यासारखी निघते वाचा। औषधावाचूनि न होय शौच्या। बोटात आँगठया हिरकणीच्या। मिरवोनी काय ?

सतत नशेमधे असल्याने उच्चार स्पष्ट नसतात, नैसरगिक पणे  झोप येणें, पोट साफ़ होण जवळ जवळ बंदच होत, यासाठीसुद्धा व्यसनी व्यक्ती दारूचाच आधार घेते। 


हा पूर्ण पाठ अगदी मोजक्या शब्दात बहुतेक सर्व घटकांवर उजेड पडतो। 



No comments:

Post a Comment