Search This Blog

Friday, 5 September 2014

थांबून रहाणे : व्यसनमुक्तीमधील आव्हान


जगभरामधे व्यसनमुक्ती उपचारापुढील सर्वात मोठे आव्हान म्हणजे रुग्णांनी उपचारानंतर  पुन्हा व्यसनाकडे न वळणे। नशा करणे थांबवणे या ही पेक्षा अधिक नशा न करता थांबून रहाणे हे खुप मोठे आव्हान आहे. अनेकदा रुग्णमित्र सांगतात की मला वाटल की मी थांबवू शकतो, दारू बंद करणे हा काही खूप कठीण विषय नाही। पण गंमत अशी की थांबवलेली दारू पुन्हा दबक्या पाउलाने कधी पूर्णतः परत गुरफटून टाकते हे मात्र कधीच कळत नाही।

अशावेळी अस वाटत की व्यसनमुक्ती साठी 'थांबून रहाणे ' हेच धेय ठेवले पाहिजे। व्यसनाचा रोग हा पुन्हा पुन्हा उलटणारा रोग आहे, रुग्ण काही काळ व्यसनाशिवाय राहतो आणि पुन्हा पूर्वी प्रमाणेच व्यसन करू लागतो। थांबून राहण्यामधे काही खालील अडथळे येतात।

१. व्यसनमुक्तीची प्रेरणा टिकून न रहाणे: नशा बंद करणे का ठरवले? यामागची प्रेरणा सातत्याने टिकून राहत नाही। शारिरिक परिस्थितीत सुधार होताच पूर्णतः व्यसनमुक्त  होण्याची गरज जणू नष्ट होते। आपण आजारी आहोत या गोष्टीचा स्वीकार करणे कठीण होऊ लागते। काहीवेळा नुकसानाची तीव्रता कमी होते जसे:  कामावरून कमी केल्यानंतर नवीन ठिकाणी काम मिळते, भांडून गेलेली बायको परत येते वगैरे मग अशावेळी रुग्णमित्राला असे वाटू लागते की व्यसनाचे दुष्परिणाम तो हाताळू शकतो। तो या दुश्परिणामांना आळा घालण्याचा प्रयत्न करतो। 

२. रोगमुक्तीच्या काळातील मानसिक तणाव: काही वेळा व्यसनादरम्यान झालेल्या नुकसानाचे पडसाद पुढे अधिक काळपर्यंत दिसून येतो। जसे स्वतःस माफ न करता येणे, झालेल्या नुकसानासाठी स्वतःस दोषी ठरवणे, पूर्वी व्यसनाच्या काळातील गुन्ह्यासाठी न्यायालयीन चौकशीस सामोरे जाणे, अनेक वर्ष बेरोजगार राहिल्यामुळे चांगली नोकरी मिळण्यामधे अडचण येणे असे काही ताणतणाव सातत्याने समोर येतात। व्यसनमुक्तीचा काळ देखील आव्हानात्मक भासु लागतो।

३. आपलेसे करण्यामधे विलंब: नशेच्या काळात सातत्याने विश्वास भंगल्याने नशा सोडल्यानंतर नातेवाईक रुग्णावर लगेच विश्वास ठेवत नाहीत याचाही कहीवेळा रुग्णांना त्रास होतो। या काळात असे वाटू लागते की, 'मी आता नशेपासून दूर आहे तरीही कोणी माझ्यावर विश्वास ठेवत नाही मग मी कशासाठी हा त्रास सहन करू ?' अशा वेळी इतरांना वेळ देणे आवश्यक आहे. आज मी जी मेहनत स्वतःला व्यसनमुक्त ठेवण्यासाठी घेतली आहे तीच मला भविष्यामधे फायदेशीर ठरणार आहे याचा मनात विश्वास धारावा।  

शीतल बिडकर 

No comments:

Post a Comment