Search This Blog

Thursday 3 July 2014

तुमच्या सह आम्ही



ही कविता व्यसनी व्यक्तीच्या कुटुंबीयांचे मन जाणणारी आहे



अपुरा प्रयत्न आमुचा आधार बनण्याचा
मनी भाव आमच्या आजाराशी लढण्याचा
थकालो आता पुरते तुमच्या संगे
म्हणे व्यसनाचे शिकारी
तुमच्या सह आम्ही


रगडाली आम्ही प्रयत्नपूर्वक मती
आशा ठेवोनी मनी
एक न एक दिनी
जाणीव होईल तुम्हासही
अन झालो  दरिद्रतेचे वाटेकरी
तुमच्या सह आम्ही


फुके गेले नवस आणि पुराण
विरुन गेला  भगवंतावरचा विश्वास
सखे सोबती म्हणती
बनोनी नास्तिक
भोगितो भोग नशिबीचे
तुमच्या सह आम्ही


भय, निराशा, शरम आणि चिंता
रोज भोवती घालती पिंगा
आपसूक आचरली लबाडी
बनालो पापाचे भागीदारी
तुमच्या सह आम्ही


पुरे झाले हाल आता
लढू व्यसनाशी पुन्हा पुन्हा
हार येवूदे अनेकदा
पण बळ मिळेल निश्चयाला
तलवार घ्या हाती
पुन्हा वार सोसु ………
तुमच्या सह आम्ही


शीतल बीडकर









No comments:

Post a Comment