अलीकडेच अनेक नव्या रुग्णमित्रांशी चर्चा करताना मला अस वाटल की आपण सगळ्यांनी नव्यानी मॉडर्न म्हणजे काय याचा थोड़ थांबून नव्याने
विचार करायला हवा. असा विचार येण्यामागिल एक घटना खलीलप्रमाणे:
एका मध्यमवर्गीय कुटुंबातील सदस्य आपल्याच जवळच्या एका नातेवाईक कुटुंबास जेवायला बोलवतात। त्या कुंटुबात एक १५ वर्षाचा मुलगा आणि दोन १२ वर्षाच्या मुली आहेत . दोन्ही पुरुष जेवणापूर्वी ड्रिंक्स (दारू हा मागसलेला शब्द नको) पिण्याचा बेत आखतात। आपण आपल्या घरातील महिलांना सामान वागणूक देतो हे एकमेकांना दाखवण्यासाठी खास महिलांसाठी अशी 'रेड वाइन' मागवाली जाते। आता प्रश्न राहिला मुलांचा ? त्यांनी काय म्हणून पार्टीला मुकाव? मग त्यांना काहीतरी सॉफ्ट ड्रिंक मगावल गेल.
वयात आलेला मुलगा मित्रासारखा वगवावा म्हणुन त्या बापान प्रमाणिकपणे मुलाला सांगितल की 'आज बुवा आमची पार्टी आहे'. मुलगा गालातल्या गालत हसला। बापला खुष पाहून पोरग आईकडे वळल. आई जीन्स आणि कुर्ता अशा वेशात मेकअप करता करता आरश्यात बुडून गेलेली। पोरानी आईला विचारल,'आई नवीन म्यूजिक ट्रैक आहे माझ्याकडे घेवू का ?' आई बोलली, 'हु हु पण पेनड्राईव विसरायच नाही बर?'
जय्यद आणि चोख तयारी निशी दोन्ही कुटुंबीय एकत्र येतात। दोघे मॉडर्न आई बाप सह कुटुंब ड्रिंक्स घेवू लागतात। पोर आपला दिवस कधी येईल? या दिवास्वप्नात एकमेकांशी चर्चा करतात। त्यांना ऐकिवत असलेली दारुची जादू एकमेकांशी शेयर करू लागतात। इतक्यात १५ वर्षाच्या मुलाला त्याचा बाप म्हणतो, 'काय रे चव बघतो का? माझ्याबरोबरच बसून पी पाहिला पेग..... हअ हा हा '
मुलाच नशीब उजाडल (कोल्हापुरी भाषेत सांगायच तर नशीब फळफळल ) आणि आपले मॉम- डैड मॉडर्न असल्याचा त्याला आत्यंतिक आनंद झाला।
विचार करायला लावणारे प्रश्न :
१. खरच का मॉडर्न होण आरोग्यदाई सवई पेक्षा अधिक महत्वाच आहे?
२. आपण आपल्या मुलांना मद्यपान आणि सोसियल होण हे अविभाज्य आहे अस का बिंबवणार आहोत?
३. कुठल्यातरी आमुक वयात मद्यपान सुरु होण खरच अनिवार्य आहे का?
१. खरच का मॉडर्न होण आरोग्यदाई सवई पेक्षा अधिक महत्वाच आहे?
२. आपण आपल्या मुलांना मद्यपान आणि सोसियल होण हे अविभाज्य आहे अस का बिंबवणार आहोत?
३. कुठल्यातरी आमुक वयात मद्यपान सुरु होण खरच अनिवार्य आहे का?