Search This Blog

Thursday, 30 October 2014

काय झाले?

काय झाले?

मागच्या एका वर्षभरात १७ ते २५ वयोगटातले अनेक व्यसनी रुग्णांशी संपर्क आला. त्यासर्वांमधे एक समाइक असा बेफिकीरपणा दिसला, त्यांनी त्याचे आयुष्यातील गंभीर अडचणी किती क्षुद्र असल्यासारख्या मांडल्या आहेत; यावरूनच त्यांचा जीवनकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिसून येतो। हे सगळे खरच मनाला सुन्न करणार आहे.


मी जरा फिरलो कॉलेजच्या बाहेर
तर कल्ला करायला काय  झाले ?
मी जरा गेलो पार्टीला तिकडे
तर बिघडला म्हणायला काय झाले ?


अरे बाबा! सगळेच जातात गोव्याला प्यायला
तुम्हाला लगेच चिडायला के झाले ?
राहिला बैक लॉक इंजीनियरिंगला
तर वाया गेलो म्हणायला काय  झाले?


जरा कुठे मनेवर टट्टो काढला
तर गंजेड़ी म्हणायला काय झाले?
बसलो जरा मैत्रिणीच्या कड़े  डिनरला
तर  बायको म्हणायला काय  झाले?

बुडले पाच-एक हजार पैज लावून
तर कर्जबाजारी म्हणायला काय झाले?
मागितले मित्राला लाखभर रुपये
तर कर्ज केले म्हणायला के झाल?

हो हो येतोच कंटाळा घरी राहायचा
दोन दिवस न सांगता गेलो फिरायला
तर शेफारला म्हणायला काय झाल?

अहो होतोय ना त्रास माझ्यामुळे
मग सोडून द्या मला एकट
नाक कापल म्हणून हिनवायला  काय  झाल?

जमत नाही ना माझ तुमच्याशी???(अगदी उद्धट स्वरात )
मग करू वाटा वेगवेगळ्या
तुझ्या काळजीन जीव चालला म्हणायला काय झाल?

आयुष्य खुप सोप्प आहे
फायद्याच्या गणितच फळ आहे.
मर्जीच राजकारण खेळातच जवानी जगण आहे
नाहीतर.... नको नकोस ओझ आहे
नाहीतर.... नको नकोस ओझ आहे